Supriya Sule : …म्हणून महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही, सुप्रिया सुळे यांचे मोठे वक्तव्य
Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे यांनी चांदवडच्या कार्यकर्ता मेळाव्यात महाविकास आघाडीच्या आगामी सरकारच्या योजनांविषयी चर्चा करताना, राज्यातील आर्थिक अडचणी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, जिएसटी कौन्सीलच्या बैठकीत सहभागी होण्याचा अधिकार फक्त अर्थमंत्र्यांना असतो. पण राज्याचे अर्थमंत्री त्या मिटिंगला उपस्थित राहत नाहीत, त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही. त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि यामुळे राज्याची स्थिती कशी वाईट होत आहे हे दाखवले.
तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सुप्रिया सुळे यांनी गंभीर टीका केली. देवेंद्रजी अभिमानाने सांगतात की त्यांनी दोन पक्ष फोडले, ही अभिमानाची गोष्ट आहे का? कॉपी करून पास होणारा व्यक्ती चांगला अ सतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या टीकेने फडणवीसांची कार्यप्रणाली आणि नेतृत्व क्षमतांवर प्रश्न उठवले. Supriya Sule
सुप्रिया सुळे यांनी कांदा, सोयाबीन आणि कापसाच्या दरावर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी आश्वासन दिले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच सर्वप्रथम शेतीविषयक वस्तूवरील जिएसटी रद्द करण्यात येईल, हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी कांदा सोयाबीन, कापसाच्या दराबाबतचा मुद्दा उपस्थित करून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच सर्वप्रथम शेती विषयक वस्तूवरील जिएसटी रद्द करण्यात येईल असं अश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.