Supriya Sule : शरद पवार आणि अजित पवार आतून एकत्र आहेत का?, सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, ‘आमच्यासाठी….

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन फूट पडली असली, तरी उद्योजक प्रतापराव पवार यांच्या घरी पवार कुटुंब एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांबरोबरच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले
यामुळे पवार काका-पुतणे हे दोघेही एकमेकांचे विरोधक असले तरी ते आतून एकत्र आहेत असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणाले की, मी राजकारण आणि समाजकारण शरद पवार व यशवंतराव चव्हाण यांच्या संस्काराने करते. यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार शरद पवार यांच्यावर झाले तेच संस्कार माझ्यावर देखील झालेत. आपण मराठी माणसं फार सुसंस्कृत असतो आपली लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणल्या, “आमच्यासाठी तरी ही लोकशाही आहे. वैचारिक लढाई आणि प्रेमाची नाती, मैत्री वेगळी. प्रमोद महाजन हे भाजपमध्ये होते मात्र शरद पवार यांचे आजही महाजन कुटुंबाशी ऋणानुबंध आहेत.
प्रमोद महाजन नसले तरी त्यांच्याबद्दल आजही माझ्या मनात प्रेमच आहे. आणि ते कायम राहील. त्याचबरोबर मुंडे कुटुंब आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाबद्दलही तेच आहे असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.