Supriya Sule : भाजपला शरद पवार यांना संपवायच आहे! खासदार सुप्रिया सुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य, बारामतीकरांना म्हणाल्या….

Supriya Sule : भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, परंतु त्यांना मात्र शरद पवार यांना संपवायचे आहे. ते तुम्हाला चालणार आहे का? इंग्रज व्यापारी बनून आले आणि त्यांनी देश काबीज केला, तशाच पद्धतीने राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी बनण्याचे काम भाजप देशभरात करत आहे.
या महाराष्ट्राचे महत्त्व संपवण्याचे काम भाजप करत असून, भाजपा आज आमच्या घरात शिरले आहे उद्या ते तुमच्याही घरात शिरेल, तुम्हाला जागे राहावे लागेल असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांना केले आहे. Supriya Sule
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद व भावजयीचा सामना होण्याचे चित्र आता स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे काहीशा आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. सुप्रिया सुळे यांनी काल बारामतीतील कसबा भागातील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात नागरिकांशी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी गेली १८ वर्ष चांगले काम केले. संसदेत पहिला नंबर राहिला. आजपर्यंत कोणालाही दिल्लीला जायचं नव्हतं कोणालाही खासदार व्हायचं नव्हतं मी सोडून कोणालाही खासदारकी लढवायची नव्हती मी १८ वर्षे चांगले काम केले मग आता खासदारकी कुणाला मिळाला पाहिजे? मला कोणाच्याही अश्रूंवर माझा महाल बांधायचा नाही, त्यामुळे या मतदारसंघात दादागिरी चालणार नाही. जो विकास झाला तो सर्वांनी मिळून केला आहे. आता काडीमोड झाला आहे, म्हणून काय झाले? जे खरे आहे ते खरेच बोलले पाहिजे.
सुप्रिया सुळे यांनी घड्याळावरून अप्रत्यक्ष अजित पवार यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, आज कुणाच्या तरी हातात घड्याळ दिसतं का? कारण मोबाईलमध्ये घड्याळ दिसते. मला माझ्या मुलाला वाढदिवसाला घड्याळ गिफ्ट करायचे होते . परंतु माझा मुलगा तर मला म्हणाला, आई मला घड्याळ नको, कारण घड्याळ मोबाईलमध्ये पण आहे. त्यांनी भाजपवर आक्रमकपणे टीका केली.
सुरुवातीलाच त्यांनी नागरिकाची संवाद साधताना सांगितले की, भाजपला शरद पवार यांना संपवायचे आहे. ते त्यांनी बोलून देखील दाखवले आहे. हे तुम्हाला चालणार आहे का? ज्याप्रमाणे इंग्रज आले आणि त्यांनी देश काबीज केला, त्याप्रमाणे भाजपचे काम सुरू आहे.
त्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे, परंतु आम्ही अर्धी भाकरी खाऊ, पण दुसऱ्याच्या दारात चाकरी करणार नाही. दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्राचे महत्त्व संपवत आहे, तेव्हा जागे राहा. सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांना असे आवाहन केले आहे.