Supriya Sule : युगेंद्र पवारच असणार बारामती विधानसभेचे उमेदवार? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले…
Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. प्रतिष्ठेच्या या लढाईत संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिले. तर एकटं पाडल्याचा दावा करत अजित पवारांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने मतदान केले. या निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. त्यानंतर आता बारामती विधानसभेची चर्चा आतापासून सुरु झाली आहे.
विधानसभेत काका-पुतण्यात लढत रंगणार असल्याचे बॅनर्स लागले आहेत. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रथमच मत व्यक्त केले आहे. Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्या आघाडीत जागा वाटप होईल. जागा वाटपात बारामती मतदार संघावर कोण दावा करणार? कोणाचा दावा मजबूत असणार? हे ठरणार आहे.
त्यानंतर बारामतीमधून कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार असणार हे ठरणार आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार उमेदवार असणार? यासंदर्भात बॅनर्स लागले. परंतु त्यासंदर्भात आपणास माहीत नाही. मी दिल्लीत होते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. कुस्तीसंघावरुन युगेंद्र पवार यांना काढले? त्याचे आपणास आश्चर्य वाटले आहे.