Supriya Sule : बारामती लोकसभेची जागा लढवणारच! अजित पवारांच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंचे मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
Supriya Sule राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आज मोठे वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा लढवणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१) कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या वैचारिक मंथन शिबिरात ही घोषणा केली आहे. Supriya Sule
यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, असे अजित पवारांनी सांगितले. यावरून खासदार सुप्रिसा सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याबाबत सुप्रिया सुळे Supriya Sule म्हणल्या की, मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचे स्वागत करते, कारण ही लोकशाही आहे.
आमची नाती एका जागेवर आहेत आणि राजकारण वेगळे आहे. प्रोफेशन आणि नात्यात कधीच गल्लत करायची नसते, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा केली आहे. लोकशाहीत कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे.
यात काहीही गैर नाही. माझ्याविरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे, हा माझा आग्रह राहिला आहे. बाकी महाराष्ट्र आणि बारामतीतील मायबाप जनता ठरवेल, असे ही ते म्हणाल्या. यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.