Supriya Sule : इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा….


Supriya Sule : इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. यावरून सुप्रिया सुळे यांनी मागचे-पुढचे सर्व काढत, भाजप नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच थेट आव्हान दिल्याचे दिसते.

या घटनेचा निषेध करत त्यांनी गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. अशी टीका त्यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणल्या की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते.

ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे.

तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान तालुक्याचा प्रमुखच जर सुरक्षित नसेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचे काय? असा प्रश्न देखील आता राजकीय नेते मंडळी विचारू लागली आहेत. Supriya Sule

दरम्यान,या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात ‘हिट ॲड रन’ प्रकरणावरून देखील गृहमंत्र्यांना चिमटा काढला आहे. गृहमंत्री महोदय आता तरी जागे व्हा.

आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामिनावर सुटतात. या घटनेचा निषेध, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी शेअर केली आहे. लोकसभेची निवडणुकीवेळी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आलेला ताण आणि निवडणुकीनंतर राज्यात सुरू झालेल्या घटनांमुळे गृहखाते घेरले गेले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!