Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे युट्युब चॅनेल हॅक, धक्कादायक माहिती आली समोर…


Supreme Court : सायबर भामट्यांकडून सर्वोच्च न्यायालयाने यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे. चॅनल हॅक झाल्यानंतर हे चॅनल बंद करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने पत्रक काढून ही माहिती दिली आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीचे व्हीडीओ गायब झाले असून एका क्रिप्टोकरन्सीची जाहिरात दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल असून त्यावर सुनावणीचे व्हीडीओही अपलोड केले जातात. मात्र, अज्ञाताकडून हे चॅनल हॅक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे तंत्रज्ञान विभागाचे रजिस्टारकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा एकही व्हीडीओ यूट्यूब चॅनलवर दिसत नाही. एक व्हीडीओ प्ले होत असून तो क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातीचा आहे. रिप्पल असे असे नाव दिसत असून, ‘ब्रॅड गार्लिंगहाऊस : रिप्पल रिस्पॉन्ड्स टू द एसईसी २ बिलियन डॉलर फाईन.

एक्सआरपी प्राइस प्रेडिक्शन’ सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंठपीठासमोर खटल्यांची सुनावण्यांचे या यूट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाते. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. Supreme Court

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवर अलीकडेच कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कथित अत्याचार आणि हत्या प्रकरणाची याचिकेचे प्रसारण केले होते. सुनावणीच्या रेकॉर्डिंगचा शोध घेत असलेल्या युजरला सर्व व्हिडिओ खाजगी झाल्याचे दिसून आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!