Supreme Court : वयाच्या ८९ व्या वर्षी पतीची घटस्फोटासाठी सुप्रीम कोर्टात धाव, पत्नीने आपली इच्छा व्यक्त करताच सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय..


Supreme Court : लग्न झाल्यानंतर सर्वांचे आयुष्य बदलून जाते. कोणतेही नात्यात चढ-उतार असणे सामान्य आहे. पती-पत्नीचे नातेही याला अपवाद नाही. पती-पत्नीच्या नात्यात प्रेमाबरोबरच संघर्षाचाही समावेश असतो. अनेक वेळा हा संघर्ष इतका वाढतो की दोघेही आपापले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात.

साध्य असाच एक प्रकार समोर आला आहे. पती-पत्नी दोघेही दोन दशकांहून अधिक काळ कायदेशीर लढा देत आहेत. पतीला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट हवा होता. आता त्यांचे वय ८९ वर्षे आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. पत्नीही ८२ वर्षांची झाली आहे. Supreme Court

सुप्रीम कोर्टात वाद सुरू असताना पत्नीने आपल्या मनातील इच्छा न्यायमूर्तींसमोर व्यक्त केली की, तिला घटस्फोटीत महिला म्हणून मरायचे नाही. त्यांच्या भावनांचा आदर करत सुप्रीम कोर्टानेही घटस्फोटाचा पतीचा अर्ज फेटाळून लावला आहे.

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की भारतीय समाजात विवाह हा एक पवित्र आणि आध्यात्मिक संबंध मानला जातो. सर्वोच्च न्यायालयाने ८९ वर्षीय व्यक्तीची मागणी फेटाळून लावत हा निर्णय दिला. या व्यक्तीने आपल्या ८२ वर्षीय पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले की समाजात घटस्फोट होणे हा कलंक मानला जाऊ शकत नाही. पत्नीची इच्छा लक्षात घेऊन घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीने दाखल केलेली याचिकाही खंडपीठाने फेटाळून लावली आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सांगितले की, पत्नीने १९६३ पासून म्हणजे ६० वर्षे आयुष्यभर नाते जपले आहे. तिने त्यांच्या तीन मुलांची काळजी घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, पत्नी अजूनही पतीची काळजी घेण्यास तयार आहे. तिला तिच्या आयुष्याच्या या टप्प्यावर पतीला एकटे सोडायचे नाही. घटस्फोटित महिला असल्याचा कलंक घेऊन मरायचे नाही, अशी भावना पत्नीने व्यक्त केल्याचे या निकालात म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!