म्हाताऱ्या आईचा आधार, 3 मुलांचा पिता…दिल्ली ब्लास्टमध्ये घरातल्या कर्त्या पुरूषाचा दुर्दैवी अंत…


नवी दिल्ली : राजधानी दिल्ली भीषण बॉम्बस्पोटाने हादरली आहे. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झालेल्या या स्फोटात १० लोकांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटानंतर शेजारील दोन ते तीन इतर वाहनांनी पेट घेतला.

या आगीत तीन ते चार वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अशातच आता या स्फोटाचा तपास सुरु असताना पोलीसांना सर्वात मोठं यश मिळाले आहे. एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

या दुर्दैवी घटनेत उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी अशोक कुमार (वय 34) यांच्या दुःखद मृत्यूने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.दिल्लीत बस कंडक्टर म्हणून काम करणारा अशोक नेहमीप्रमाणे आपले काम पूर्ण करून घरी परत येत होते. पण काल त्यांचे नशीब साथीला नव्हते आणि एका स्फोटात सर्व काही उद्ध्वस्त झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाचा आधार निघून गेला.

मृत अशोकचे वडिलोपार्जित घर अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मंगरोला गावात आहे. त्याच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते आणि अशोक त्याच्या वृद्ध आईचा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा एकमेव आधार होता.

मात्र आता त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या आईला मात्र ही दु:खद बातमी अद्याप दिलेली नाही. वृद्ध आईची तब्येत अद्याप नाजूक असल्याने त्यांना मुलाच्या जाण्याबद्दल कळवलेलं नाही. अशोक यांच्या अकस्मात जाण्यामुळे गावातील प्रत्येकाचे डोळे अगदी पाणावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक यांच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुलं आहेत. ते दिल्लीत भाड्याच्या घरात राहत होते. त्याच्या पगारातून कुटुंबाचा सर्व खर्च भागत असे.नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, तो खूप कष्टाळू माणूस होता, कामानंतर दररोज कुटुंबासाठी सामान घेऊन घरी परतत असे. अशातच त्याच्या अकस्मात मृत्यूची आम्ही कल्पनाही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी साश्रूनयनांनी दिली.

अशोकचा चुलत भाऊ सोमपाल शर्मा म्हणाला की, टीव्हीवर स्फोटाची बातमी झाल्यानंतरच पोलिस गावात आले आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. आम्हाला टीव्हीवरून कळलं की दिल्ली बॉम्बस्फोटात अमरोहा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असं कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं.

काही वेळाने पोलिस आले आणि त्यांनी नावाची पुष्टी केली.हे अगदी दुर्दैवी आहे; एवढी मोठी चूक कशी झाली असेल? पीडितया कुटुंबाला सरकारने पुरेशी भरपाई द्यावी आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा करावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे. अशोक सारखा साधा-सुधा माणूस या स्फोटाची शिकार झाल्याने सर्वांच्या डोळयांत अश्रू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!