सोरतापवाडीच्या सरपंचपदी सुनिता चौधरी यांची बिनविरोध निवड ….


उरुळी कांचन : सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या,सरपंचपदी सुनिता कारभारी चौधरी यांची बिनविरोध निवड झाली
आहे. सरपंचांच्या विभागून दिलेल्या संधीनुसार या पदावर त्यांची ही नियुक्ती शेवटची ठरली आहे.

सरपंच मनिषा नवनाथ चौधरी यांनी आपल्या निर्धारीत वेळेत सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने बुधवार(दि.२९)रोजी सरपंचपदाची निवडणूक पार पडली. मंडळ अधिकारी तथा निवडणूक अधिकारी मंगल बागवे व ग्रामविकासअधिकारी संतोष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत सरपंच पदी औपचारिकतेने सुनिता कारभारी चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीप्रसंगी मावळत्या सरपंच मनिषा चौधरी ,पुणे जिल्हा भाजप महिला अध्यक्ष पुनम चौधरी, पुणे बाजार समिती संचालक सुदर्शन चौधरी, युवा नेते ऋषीराज उर्फ मनोज चौधरी, अमित चौधरी, शंकर कड, सनी चौधरी, माजी सरपंच सुप्रिया चौधरी, पुनम आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

       

दरम्यान पाच वर्षापूर्वी झालेल्या सत्तासंघर्षानंतर दोन्ही,गटांनी समझोत्यानुसार सरपंच व उपसरपंचपदे आपल्याकडे ठेवून
ग्रामपंचायतीची वाटचाल केली आहे. ग्रामपंचायतीला पाच वर्षातपुणे जिल्हा परिषदेचा स्मार्ट व्हिलेज म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर नुकत्याच या गावात मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाचे,पुणे जिल्ह्याचे योजनेचे यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. तर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामपंचायतीचासामावेश डिजीटल स्मार्ट व्हिलेज म्हणून करण्यात आला असून
या माध्यमातून ग्रामपंचायतीला जिल्हा यंत्रणेशी डिजिटल पद्धतीने,जोडण्यात येणार असून गावात स्वच्छता, आरोग्य, कृषी तसेच
शेतीशी निगडीत पिकांना हवामान तंत्रज्ञानावर आधारीत तंत्रज्ञान,डीजीटल स्वरूपात उपलब्ध करुन देत कृषी सुधारणांसह
पायाभूत विकासाचा पाया रचला जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!