Sunil Tatkare : मोठा अनर्थ टळला!! सुनील तटकरे प्रवास करणार होते ते हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?


Sunil Tatkare : पिंपरी चिंचवडमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बावधन परिसरातील केके राव डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले.

पुण्यातील बावधनमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. याच हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते. पण त्याआधीच हे हेलिकॉप्टर कोसळले.

पुणे ते मुंबई असा प्रवास हे हेलिकॉप्टर करणार होतं. सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर येत होतं. मुंबईतील जुहूमधून सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने पुण्याला जाणार होते. साडे सात वाजता या हेलिकॉप्टरचं टेकऑफ झालं. पण काही मिनिटात हे हेलिकॉप्टर कोसळले. Sunil Tatkare

बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी ऑडिटची मागणी केली आहे.ऑक्सफर्ड हेलिपॅडवर नियमित ऑडिट व्हावं. अन्यथा गावकरी म्हणून आम्ही आंदोलन करू आणि हेलिपॅड बंद करू, असा इशारा स्थानिक नेते दिलीप वेडे पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, जिथं हे हेलिकॉप्टर कोसळलं तिथून जवळच केंद्र सरकारची एचईएमएआरएल दारूगोळा बनवणारी कंपनी आहे. जर तिथे हे हेलिकॉप्टर कोसळलं असतं तर किती मोठी दुर्घटना घडली असती? अशी चिंताही दिलीप वेडे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!