चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? खरात प्रकरणात मोठा खुलासा, SIT कडे तक्रार करणारी व्यक्ती कोण?


पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता विशेष तपास पथकाकडे आलेल्या एका तक्रारीमुळे राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या तक्रारीनुसार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याच म्हटल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी कनेक्शन असलेल्या रूपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार बीड मधील एका व्यक्तीने विशेष तपास पथकाकडे केली आहे.
तक्रार करणाऱ्या व्यक्तीचा एसआयटी शोध घेत आहे. या तक्रारी त्या व्यक्तीने केलेला दावा पोलिस यंत्रणा तपासत आहे.

बीड मधील एका व्यक्तीने केलेले तक्रार थेट भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. अशोक खरात यांच्या ट्रस्टवर चाकणकर या ट्रस्टी म्हणून कार्यरत होत्या असा आरोप यापूर्वी झाला होता.याच पार्श्वभूमीवर आता थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच राजकीय सूडबुद्धीतून ही तक्रार करण्यात आली आहे का? या अँगलनेही पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. यातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!