सुनेत्रा पवार यांचा पक्षातील जिल्ह्यातील पहिलाच निर्णय; जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी च्या गटनेतेपदी श्रीमंत ढोले यांची निवड….


पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी इंदापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची शुक्रवारी (ता.६) निवड करण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नवीन गटनेत्याचे नाव बंद पाकिटातून पाठवले होते. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत हे बंद पाकिट उघडले आणि गटनेतेपदी श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.

या निवडीस पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक शुक्रवारी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे जिल्हा समन्वयक सुरेश घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

दरम्यान, यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार, पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, देवराम लांडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, राजेंद्र कोरेकर, विठ्ठल शिंदे, जिल्हा परिषदेतील माजी गटनेते शरद बुट्टे पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!