सुनेत्रा पवार करणार शिवजयंती उत्सवानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघातील गडकिल्ल्यांवर पुष्पवृष्टी…

बारामती : राज्याच्या राजकारणात अनेक घडताना दिसत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना उद्या शिवजयंती उत्सवानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघातील गड किल्ल्यावर सुनेत्रा पवार यांच्याकडून हेलिकॉप्टर मधून पुष्यवृष्टी केली जाणार आहे.

योगायोगाने उद्याच महायुतीकडून राष्ट्रवादीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नावही निश्चित होणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने सुराज्य संकल्प आणि शिवकालीन गडकिल्ले पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात इंदापूर मधून होणार आहे. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची ही योजना आहे.
दरम्यान, इंदापूर मधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाला सुरवात होणार असून इंदापूर मधील मालोजीराजे गढी, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, राजगड किल्ला, तोरणा किल्ला, सिंहगड किल्ला याठिकाणी पुष्यवृष्टी होणार असून आंबेगाव येथील शिवसृष्टीत सुराज्य कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
