Sunetra Pawar : लोकसभेला पराभव, तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार? नेमकं कसं?


Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. प्रतिष्ठेच्या या लढाईत संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिले. तर एकटं पाडल्याचा दावा करत अजित पवारांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने मतदान केले. या निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. हा पराभव अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

सुप्रिया सुळेंकडून पराभव, तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

राज्यसभेच्या रिक्त होणा-या जागेवर सुनेत्रा पवारांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुखांनी केली आहे. Sunetra Pawar

सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्तम नेतृत्व गुण तसेच राजकारणाची आवड असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी करण्यात आली. रिक्त होऊ घातलेल्या राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात यावी यासाठी ठराव करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!