Sunetra Pawar : बारामती लोकसभेच ठरलं! सुनेत्रा पवार यांच्या गाठीभेटी वाढल्या, कुल कुटूंबाची घेतली भेट…

Sunetra Pawar पुणे : राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत त्या तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

या राजकीय भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे त्यांची उमेदवारी देखील फिक्स मानली जात आहे. पण अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व राजकीय सूत्र सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोवती आहेत. Sunetra Pawar
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढल्या होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला होता.

सध्याच्या राजकारणात अनेक समीकरणे बदलली आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात सुनेत्रा पवार या उमेदवार असणार असे म्हटले जात आहे. सध्या अजित पवार हे भाजपकडे गेले असल्याने सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक अवघड मागणी जात आहे.
अजित पवार यांनी आधीच सांगितले आहे की, मी उभा आहे असे समजून मतदान करा. जर तसे झाले नाही तर बघा, असं म्हणून त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून ही जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.