मोठी बातमी! माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड…


पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज अपेक्षेप्रमाणे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याची माहिती बारामतीचे प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण स्वतःच कारखान्याचे अध्यक्ष होणार असे जाहीर केल्याने चांगले चर्चेत आले होते. त्यानंतर खरोखरच अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारले.

त्यानंतर या कारखान्यातील बऱ्याच कामकाजातील वेगळ्या व विधायक बाबी अजित पवारांनी सुरू केल्या होत्या. मात्र अचानक त्यांचे अपघाती निधन झाले आणि कारखान्याच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या संचालकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत त्यांना अध्यक्ष पद स्वीकारण्याची गळ घातली आणि संचालकांच्या आग्रहामुळे सुनेत्रा पवार यांनी हे अध्यक्षपद स्वीकारण्याची संमती दिली.

त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक एक मार्च रोजी प्रशासनाने जाहीर केली. मात्र एक मार्च रोजी अचानक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर हे आजारी असल्याच्या कारणावरून अनुपस्थित राहिले आणि ही अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली गेली होती.

दरम्यान, आज 12 मार्च रोजी प्रशासनाने ही निवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार आज दुपारी 3 वाजता सुनेत्रा पवार या कारखान्यात पोहोचल्या. त्यानंतर संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, सभापती किरण तावरे, नगराध्यक्ष सचिन सातव, अविनाश गोफणे, विनायक गावडे, रविंद्र माने, संजय कोकरे यांनीही उपस्थित राहून सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!