शालेय विद्यार्थ्यांना उद्यापासून उन्हाळी सुट्टी! शिक्षकांची शाळा मात्र सुरूच, जाणून घ्या…


पुणे : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आजपासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आज शालेय विद्यार्थ्यांचा चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राचा शेवटचा पेपर आहे. चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 आज संपणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आज 25 एप्रिल 2025 रोजी समाप्त होतील आणि त्यानंतर उद्यापासून 26 एप्रिल पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत.

याबाबत पालकांनी उन्हाळी सुट्ट्या कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला होता आणि यंदा उन्हाळी सुट्ट्या उशिराने का लागत आहेत यामुळे नाराजी पाहायला मिळत होती. वाढत्या तापमानामुळे पालक चिंतेत होते. आता उद्यापासून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागणार आहेत. मात्र असे असले तरी शालेय शिक्षकांना मे महिन्यात सुद्धा शाळेत यावे लागणार आहे.

शिक्षकांची उन्हाळी सुट्टी 6 मे 2025 पासून सूरु होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेला कधी सुरुवात होणार, उन्हाळी सुट्ट्यानंतर शाळा कधी सुरू होणार याबाबत सुद्धा मोठी माहिती समोर येत आहे. 1 मे 2025 रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा शिक्षकांना काही दिवस शाळेत यावे लागणार आहे.

खरे तर आज विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर आहे आणि त्यानंतर एक मे ला निकाल लागेल यामुळे शिक्षकांना आता या दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांचे पेपर तपासावे लागणार आहेत आणि त्यांचे निकाल तयार करावे लागणार आहेत. दरवर्षी एप्रिलचा पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा घेतली जात असते मात्र यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली.

दरम्यान, 15 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 ला सुरुवात होईल आणि हा दिवस शाळेचा पहिला दिवस असेल. असेही सांगितले जात आहे. यावर्षी भीषण उन्हाळा जाणवत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यामुळे पालक याबाबत मागणी करत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!