Sugarcane News : उसाला येणार अच्छे दिन.? कारखान्यांकडून पळवापळवीही होणार, १० ऑक्टोबरनंतर हंगाम होणार सुरू
Sugarcane News पुणे : राज्यातील सध्याची कमी पावसाची स्थिती लक्षात घेता आणि तब्बल ५० हजार हेक्टर उसाचे क्षेत्र कमी झाले असल्याने, पावसाने ओढ दिली असल्याने या वर्षी उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
तसेच ही शक्यता गृहीत धरून यावर्षीचा गळीत हंगाम एक ऑक्टोबर ऐवजी १० नोव्हेंबरनंतर सुरू होईल. यंदाचा गळीत हंगाम साखर कारखान्यांसाठी (Sugarcane News) अडचणीचा बनणार असून, उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.
साखर आयुक्तालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गळीत हंगाम नक्की केव्हा सुरू करायचा, या संदर्भात मंत्रीसमिती निर्णय घेईल, मात्र एकंदरीत चित्रानुसार यावर्षीचा गळीत हंगाम १० नोव्हेंबर नंतर सुरू होण्याची शक्यता अधिक आहे.
संपलेल्या गळीत हंगामात राज्याने साखर उत्पादनाचा उच्चांक केला. गेली दोन ते तीन वर्ष महाराष्ट्र उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन करतो, परंतु यावर्षी स्थिती मात्र बिकट आहे. पावसाची ओढ, संभाव्य दुष्काळाची स्थिती आणि अडचणीतील कारखाने या तिन्ही गोष्टींचा विचार करता यावर्षीचा साखर हंगाम साखर कारखान्यासाठी बिकट अडथळ्यांची वाट ठरणार आहे.
संपलेल्या गळीत हंगामात मे महिन्यापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशात 103 लाख टन साखर उत्पादित झाली. मात्र यंदा उसाच्या क्षेत्रात घट झाल्याने उसाचेही उत्पादन घटणार आहे.
मागील वर्षी १०५३ लाख टन उसाचे गेल्या वर्षी गाळप झालं होतं. राज्यात २११ साखर कारखाने आहेत. मात्र यंदा त्यातील काही कारखाने गाळप हंगाम सुरू करू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे.
तर इतर कारखाने की, ज्यांनी त्यांची गाळप क्षमता वाढवलेली आहे, मात्र त्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे, असे कारखाने ऊस पळवा पळवीच्या स्पर्धेत उतरतील अशी शक्यता आहे.