नवी दिल्लीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघच्या वतीने साखर उद्योग परिषद संपन्न, ऊसशेतीबाबत बहुमुल्य मार्गदर्शन..

नवी दिल्ली : येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघच्या वतीने आयोजित केलेल्या साखर उद्योग परिषद प्रसंगी साखर उद्योगावरील प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी सहकारी संचालक, साखर तज्ज्ञ, उद्योजक, शेतकरी, संशोधक, अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेचा उद्देश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून साखर व सहउत्पादनांच्या माध्यमातून उद्योगास उभारी देणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादकांना अधिक समृद्ध बनविणे हा आहे. देशात सुपीक जमिनी, अनुकूल हवामान व पर्जन्यमान, विस्तीर्ण क्षेत्रामुळे शेतीचे यांत्रिकीकरण, किमान सहा खोडवे, यांत्रिकी तोडीमुळे पाचटाचे आच्छादन, सुधारित ऊस जाती अशा सर्वच विषयांवर चर्चा झाली.
उसाची वाढ जोमाने व्हावी यासाठी साखर व इथेनॉल उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा वापर केला जातो. शाश्वत ऊस उत्पादकता वाढीसाठी, भागधारकांचे विचारमंथन करणे आवश्यक आहे. यात शेतकरी, संशोधन संस्था, शासनाचे विभाग, आणि ऊस प्रक्रिया उद्योग यांचा सहभाग असायला हवा.
या विचारमंथनात ऊस उत्पादनामध्ये वाढ आणि शाश्वतता यावर चर्चा केली, ज्यामुळे ऊस शेती अधिक फायदेशीर आणि पर्यावरणासाठी सुरक्षित होऊ शकते. ऊस उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी, शेतकरी नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती वापरू शकतात. यामध्ये, अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस वाणांचा वापर, योग्य खत आणि सिंचन व्यवस्थापन, आणि कीड नियंत्रण यांचा समावेश आहे. याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी माहिती दिली.