Sugar Factory Maharashtra : हंगाम सुरू होण्यापूर्वीच मोठा झटका! राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश

Sugar Factory Maharashtra : राज्यातील साखर कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु केंद्रिय प्रदुषण मंडळाने महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Sugar Factory Maharashtra
पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात यावी असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील सहकारी साखर कारखानदारांना हंगाम सुरू होण्यापूर्वी मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रातील २१० सहकारी साखर कारखान्यांपैकी १०५ कारखान्यांमध्ये गळीत हंगाम सुरू होणार आहे. दरम्यान राज्यातील ४५ कारखान्यांना प्रदुषन मंडळाने नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान राज्यातील अनेक साखर कारखाने प्रदुषनाचे निय पाळत नसल्याची बाब कित्येक वेळा समोर आली होती. यामुळे अनेक जिल्ह्यातील नद्यांवर थेट परिणाम झाला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कमलेश सिंग यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ४५ साखर कारखान्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्यास या कायद्याच्या कलम ५ नुसार कोणताही कारखाना बंद करणे, कारखान्याचे वीज पाणी, तोडणे त्याचबरोबर अन्य सुविधा बंद करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
या ४५ कारखान्यांना भेट देऊन पाहणी करून सत्यस्थिती जाणून घ्यावी. गंभीर उल्लघंन करणारे कारखाने बंद करण्याची प्रक्रिया निश्चित करावी तसेच वीज तोडण्याचे निर्देश महावितरणला द्यावेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेश रद्द झाल्याशिवाय यातील कोणत्याही कारखान्याचा हंगाम चालू होणार नाही, असे पहावे. याचा अहवाल १० नोव्हेंबरपर्यंत द्यावा, असे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे.