Sugar Factory : राज्यातील १२० कारखाने बंद!! १०६ लाख टन साखर उत्पादन, कोल्हापूर विभागात सर्वाधिक उत्पादन…
Sugar Factory : राज्यात यंदा आतापर्यंत समाधानकारक साखर उत्पादन नोंदवले गेले आहे. राज्यात ऊस गाळप हंगाम शेवटाला आला आहे. तसेच २७ मार्च २०२४ पर्यंत राज्यात १,०३७ लाख ८९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.
त्याद्वारे १,०५९ लाख २२ हजार क्विंटल अर्थात जवळपास १०६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर राज्यात आतापर्यंतच्या एकूण गाळप हंगामात सरासरी १०.२१ टक्के साखर उतारा मिळाला आहे. अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. Sugar Factory
आतापर्यंत १२० कारखाने बंद
कोल्हापूर विभागात सर्वाधिक उत्पादन
विभागनिहाय साखर उत्पादन
आतापर्यंत १२० कारखाने बंद
याशिवाय राज्यात यावर्षीच्या गाळप हंगामात एकूण २०७ कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. यामध्ये १०३ सहकारी तर १०४ खासगी साखर कारखान्यांच्या समावेश आहे. तर राज्यातील आतापर्यंत एकूण १२० साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. आपल्या प्रभाव क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस संपल्याने, या कारखान्यांनी आपले गाळप थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
विभागनिहाय साखर उत्पादन
कोल्हापूर – २७३.५३ लाख क्विंटल
पुणे – २७३.५३ लाख क्विंटल
सोलापूर – १९८.०८ लाख क्विंटल
अहमदनगर – १३३.२७ लाख क्विंटल
छत्रपती संभाजीनगर – ८५.५९ लाख क्विंटल
नांदेड – ११८.७७ लाख क्विंटल
अमरावती – ९.०७ लाख क्विंटल
नागपूर – २.२२ लाख क्विंटल
दरम्यान, राज्यात २७ मार्च २०२४ पर्यंत कोल्हापूर विभागात सर्वाधिक ऊसगाळप, साखर उत्पादन व उतारा नोंदवला गेला आहे. कोल्हापूर विभागात ४० कारखान्यांद्वारे सर्वाधिक २३७ लाख ३१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, एकूण २७३ लाख ५३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
तर कोल्हापूर विभागात सर्वाधिक सरासरी ११.५३ टक्के उतारा मिळाला आहे. तर राज्यात यंदाच्या गाळप हंगामात नागपूर विभागात सर्वात कमी ३.७८ लाख मे. टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून केवळ २.२२ लाख क्विंटल साखर उत्पादन मिळाले आहे.