एनसीडीसीकडून राज्य सरकारच्या हमीवर साखर कारखान्यांना मिळणार कर्ज, जाणून घ्या कर्ज मिळणारे कारखाने..


पुणे : गेल्या दोन वर्षापासून साखरेला भाव चांगला असला तरी एफआरपीसह ऊस तोडणी, ओढणीच्या दरात वाढ आणि कर्जाचा बोजा यामुळे कारखान्यांसमोर अडचणी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना देखील जास्तीचे पैसे देण्यात अडचणी येत आहेत. यामुळे अनेक कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

ज्यांची आर्थिक स्थिती अगोदरच नाजूक आहे, त्यांची तर पुरती दमछाक झाली आहे. अशा कारखान्यांना कमी व्याज दराचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. याबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील आठ कारखान्यांच्या कर्जास मंजुरी दिली आहे.

यामध्ये हमीमध्ये आठ पैकी तब्बल सात कारखाने हे महायुतीच्या नेत्यांचे आहेत. शरद’, ‘मंडलीक’, ‘कुंभी’, ‘राजाराम’, ‘आजरा’ या कारखान्यांना ७४८ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध हाेणार आहे. या अर्थसहाय्यामुळे कारखान्यांना बूस्टर डोस मिळणार आहे. यामुळे या कारखान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

यामध्ये शरद – १८८.४६ कोटी, राजाराम – १६५ कोटी, हमीदवाडा – १३९ कोटी, कुंभी – १३३.४४ कोटी, आजरा – १२२.६८ कोटी अशी रक्कम मिळणार आहे. एनसीडीसीकडून मिळालेल्या कर्जाला पहिली दोन वर्षे हप्ते नाहीत. त्याशिवाय हे कर्ज केवळ ८ टक्क्यांनी मिळते, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ११ टक्क्यांनी घेतलेले कर्ज यातून भागवता येते.

दरम्यान, राज्य शासनाच्या हमीवर राज्यातील आठ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम ने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पैशाचा योग्य प्रकारे विनियोग होण्याची गरज आहे. अनेक वेळा त्याचा वापर योग्य पद्धतीने न झाल्याने कर्जाचा डोंगर उभा राहतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!