ऐन अतिवृष्टीच्या संकटात मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया सेठीचीं अचानक बदली ; चर्चांना उधाण

पुणे : मराठवाड्यासह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. महापुराने शेतकरी उध्वस्त झालेला असताना मदत आणि पुनर्विसन विभागाच्या सोनिया सेठी यांची अचानक बदली करण्यात आली आहे.त्यामुळे अनेक उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी यांची बदली केली. दरम्यान याच मुद्दयांवर बोट ठेवत काँग्रेसने सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या आदेशानुसार, विनिता वेद सिंघल यांनी सेठी यांची जागा घेतली आहे. सेठी यांना महानगरपालिका संचालित बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाचे महाव्यवस्थापक बनवण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. या पुरामध्ये केवळ पिकांचं नुकसान झालं नाही तर जनावर देखील मोठ्या प्रमाणावर दगावले आहेत. अशा स्थितीत पिडीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासंदर्भात मदत आणि पुनर्विसन विभागाची मोठी भूमिका असते. मात्र विभागाच्या सचिवांचींच बदली करण्याचा आदेश शासनाने काढल्याने उलट सुलट चर्चांना उधान आला आहे. सोनिया सेठी यांना महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र त्यांची बदली अचानक का करण्यात आली यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

