औरंगजेबाचे उदात्तीकरण हा योगायोग नाही; उदात्तीकरण हे खपवून घेणार नाही – देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांत अचानकपणे औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण होणे हे काही सहज घडलेले नाही. हा योगायोगही नाही. विरोधी पक्षही दंगली घडतील, दंगली घडतील असे वारंवार सांगत आहे.
औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण योगायोग असू शकत नाही. एका विशिष्ट समाजाचे लोक हे करत आहेत. आम्ही हे प्रकार आजिबात खपवून घेणार नाही, कोल्हापूर प्रकरणात आधिक खोलात जाण्याची गरज आहे, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची एकत्रित पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भाष्य करत विरोधकांना थेट इशारा दिला.
Views:
[jp_post_view]