उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘स्काऊट गाईड’ राज्य पुरस्कार..!

पुणे: स्वामी विवेकानंद अकॅडमी उरुळी कांचन येथील विद्यालयाच्या स्काऊट गाईड पथकातील 18 विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड राज्य पुरस्कार मिळाला आहे. यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारत स्काऊट गाईड राज्य कार्यालयाच्या वतीने दरवर्षी पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन केले जाते. 12 -2- 2026 ते 15 -2- 2026 या कालावधीत आयोजित केलेल्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात स्काऊट विभागातून सहा विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये आशिष भीमसेन रणदिवे,यशराज बाबुराव थोरात, विश्व राहुल जवळकर,यश धनंजय कापणे, सिद्धांत मल्लिनाथ शिंगे, उत्कर्ष प्रशांत किर्वे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तर गाईड विभागाची राज्य पुरस्कार परीक्षा 16 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आली. त्यामध्ये 12 विद्यार्थीनीं यशस्वी झाल्या आहेत. यामध्ये स्वराली विशाल फडतरे, संस्कृती विशाल म्हेत्रे, स्वरा सुभाष वलटे,अंतरा प्रशांत बगाडे,अक्षरा सोमनाथ कदम सिद्धी फुलचंद ढवळे,सिद्धी अशोक ठुले, सिद्धी विनोद शिवरकर, कार्तिकी रामराज काकडे, समृद्धी सचिन त्र्यंबके, कार्तिकी भागोजी कामठे,स्वरांजली रवींद्र गुंजाळ या विद्यार्थ्यांनींचा समावेश आहे.

राज्यातून अनेक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. या अठरा विद्यार्थिनींनी स्काऊट व गाईड शिबिरात सहभाग घेऊन परीक्षा यशस्वीरित्या पास झाले आहेत. नुकताच भारत स्काऊट गाईड विभागातून निकाल जाहीर करण्यात आला.वरील परीक्षेसाठी विद्यालयाचे स्काऊट शिक्षक नागेश काळभोर व गाईड शिक्षिका दिपाली शिर्के यांनी मार्गदर्शन लाभले.

दरम्यान राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या ट्रस्टी मेंबर,स्वामी विवेकानंद अकॅडमीचे प्राचार्य, उप प्राचार्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -पालक यांनी अभिनंदन केले.या पुढील असणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार तयारीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.