Student Suicide : दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, भयंकर कारण समजताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली…


Student Suicide : राजस्थानच्या कोटा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोटा शहरातील बजरंगनगर परिसरात ही घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे.

कृपांगी असे या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, कृपांगी तिच्या मामाच्या घरी राहत होती. तिचे वडिलही तिच्यासोबत तिथेच राहत होते. तिच्या वडिलांनी तिला मोबाईल फोन वापरण्यास नकार दिला त्यामुळं नाराज झालेली कृपांगी तिच्या खोलीत गेली. तर, तिचे वडिलही ऑफिससाठी गेले.

मात्र, खूप वेळ झाला तरी कृपांगीच्या खोलीतून काहीच आवाज आला नाही. म्हणून तिच्या आजीने दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीच आवाज आला नाही. तिच्या आजीला संशय आल्यानंतर तिने आजूबाजूच्या लोकांना बोलवले आणि पोलिसांनाही याबाबत सूचना दिली.

पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले तर कृपांगीने गळफास घेतला होता. याबाबत पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली. त्यावेळी तिच्या वडिलांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, परीक्षा जवळ आल्याने मी तिला मोबाईल फोन देण्यास नकार दिला.

याआधीही तिला सतत फोन वापरते म्हणून मी ओरडलो होतो. पण ती असं काही पाऊल उचलेल याचा आम्हाला कोणालाही अंदाज नव्हता. या घटनेने तिच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group