खळबळजन! विद्यार्थिनीवर वर्गातीलच अल्पवयीन मित्राकडून बलात्कार करुन गर्भवती; लोणीकाळभोर येथील घटना उघड…

लोणी काळभोर : अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिक्षण घेत असलेल्या मित्राने वारंवार बलात्कार केल्याची घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल होताच, अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी १६ वर्षाची तर मुलगा १७ वर्षाचा आहे.दोघेही एकाच इमारतीत राहतात. व लोणी काळभोर येथील एका नामवंत शैक्षणिक संकुलात एकाच वर्गात शिक्षण घेत आहेत. शाळेत जाताना व येताना दोघेही एकत्र येत-जात असतात. जानेवारी २०२५ मध्ये इमारतीच्या गच्चीवर अभ्यास करत असताना त्यांने तिला तेथे असलेल्या खोलीत नेवुन जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतरही त्याने तिच्या अज्ञानपनाचा फायदा घेत तिला धमकी देवुन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सदर प्रकार हा जानेवारी ते ११ सप्टेंबर २०२५ या दरम्यान वारंवार घडला आहे. या प्रकारातून ती ७ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी पिडीतेच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप करत आहेत.
