कॉपी मुक्त अभियानाला शिक्षकांकडूनच हरताळ ! केडगाव विद्यालयात ९ शिक्षकांविरुध्द कॉपी पुरविल्याचा गुन्हा दाखल…!


यवत : विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यासाठी देश व राज्यभरात कॉपीमुक्त परिक्षा अभियान राबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे, अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना सामुहिक कॉपी पुरविल्याची खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता १२ वीच्या परिक्षेस  कॉपी पुरविल्या म्हणून केडगाव (ता. दौंड) येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयातील ९ शिक्षकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी विद्यालयातील स्थानिक ९ शिक्षकांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी ( ता. २७ ) फेब्रुवारीच्या १२ वी च्या परीक्षा सुरू असताना भरारी पथकाने या ठिकाणी भेट दिली असता व तपासणी केली असता या ठिकाणी काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले. व या सर्व गोष्टी ला या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्ष रित्या जबाबदार असल्याचे निदर्शनास आले म्हणून पथकाने पोलिसांत तक्रार दिली आहे.

  या प्रकरणी किसन दत्तोबा भुजबळ( वय ५४  व्यवसाय – नोकरी विस्तार अधिकारी शिक्षण प्राथमिक विभाग पुणे) यांनी यवत पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.जवाहरलाल विद्यालयातील परिक्षा केंद्रावर असलेले शिक्षक  जालींदर नारायण काटे ( परिक्षा केंद्र संचालक), रावसाहेब शामराव भामरे ( उप केंद्र संचालक)  प्रकाश कुचेकर,  विकास दिवेकर ,  शाम मोरगल ,  कविता काशिद ,जयश्री गवळी,  सुरेखा होन ,  अभय सोननवर या शिक्षकांवर महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन १९८२ ( महाराष्ट्र विदयापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा १९८२ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

दरम्यान केंद्र व राज्य सरकारने कॉपी मुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी यांना
कॉपी मुक्त अभियान राबविण्याची जबाबदारी दिली आहे. या प्रयत्नांना शिक्षकांनीच मूठमाती दिल्याने गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांवर प्रशासन काय कारवाई करणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!