राज्यातील कारखान्यांचा काटामारीचा सुळसुळाट!! अगदी पध्दतशीरपणे शेतकऱ्यांचा काढला जातोय काटा, जाणून घ्या…

कोल्हापूर : सध्या उसाचा हंगाम सुरू आहे. मात्र कारखान्यात काटा मारला जात असल्याचा अनेकांच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतकरी नाराज आहेत. साखर कारखान्यांचा वजन काटा गेल्या काही वर्षापासून ऑनलाइन केला आहे. त्यामुळे चोख वजन होते अशा भ्रमात शेतकरी आहेत. ऑनलाइन काट्यातूनही शेतकऱ्यांचा काटा काढण्याचे काम सुरूच आहे.

ऊस कारखान्याला घालवून शेतकरी निवांत होतो. असे असले तरी डोळ्यामाधारी काटामारीचा खेळ कसा चालतो, रात्रीचीच वाहने जादा उतरून का घेतली जातात, बाहेरून वजन करायला वाहतूकदार का घाबरतात, याची उत्तरे अनुउत्तरीत आहेत. यामुळे काटामारी होते हे वेगळं सांगायचं का? असा प्रश्न आहे.
तसेच ऑनलाइन काट्याजवळ कारखान्यांनी संगणक का बसविला आहे. याबाबत सीमाभागातील शेतकरी अनेक तक्रारी करत आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील सीमाभागातील ऊस मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यातील कारखान्यांना पाठविला जातो.

यामध्ये २० टनाच्या खेपेला एक ते दीड टन काटा मारला जात असल्याच्या तक्रारी शिरोळचे शेतकरी करत आहेत. अनेक साखर कारखाने बाहेरून वजन केलेल्या वाहनाला आत प्रवेशच देत नाहीत. परंतु शेतकरी स्वतःच्या मालाचे वजन करून आला तर त्यात चूक काय, जगात असा कोणता धंदा आहे जेथे खरेदीदार डोळ्यामाधारी वजन करणार अन् ते ग्राहृा मानायचे.
परंतु सर्वच शेतकरी जर बाहेरून वजन करून यायला लागले तर कारखानदारांची दुकानदारी थांबेल, या भीतीने वाहतूकदारावर दबाव टाकून बाहेर वजन करण्यास मज्जाव केला जात असल्याचे दिसून येते. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये साखर कारखान्यांच्या वजन काट्याबद्दल संशयाचे वातावरण आहे. कारखाने आणि सरकार यांची संयुक्त जबाबदारी आहे. काटामारी रोखण्यासाठी सरकारने जी भरारी पथके नेमली आहेत त्यातून काटामारी रोखता येणार नसून उलट काटामारी अधिकृत होत आहे. सरकारने याबाबत पाऊले उचलली पाहिजेत.