सावरकरांच्या वक्तव्यावर आता नातवाची उडी! राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याचा इशारा…!

नवी दिल्ली : काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुढच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. मोदी आडनाव प्रकरणी आधी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाली, त्यानंतर त्यांना त्यांचे संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले. आणखी एका प्रकरणाची टांगती तलवार सुरू झाली आहे.
यावेळी वीर सावरकरांच्या नातवाने राहुल यांना सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. हिंदुत्ववादी विचारवंत वीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सावरकर म्हणाले, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे पुरावे राहुल गांधींनी द्यावेत.
रणजित सावरकर म्हणाले, राहुल गांधी सावरकर नसल्यामुळे माफी मागणार नाही असे सांगत आहेत. मी त्यांना आव्हान देतो की सावरकरांच्या माफीचा कोणताही पुरावा दाखवा.