राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राज्याचे सत्तासंघर्ष प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकारच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली असून आता राज्याचे सत्तासंघर्ष प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला होता. त्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सर्वौच्च न्यायालयात दाद मागितली होती.
यावर आज मोठा निकाल आला आहे. यामध्ये व्हीप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतात. असेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती. नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देत हा निर्णय देण्याचा अधिकार 7 जाणांच्या खंडपीठासमोर सोपविण्याचा निर्णय दिला आहे.
दरम्यान, आज निर्णय जाहीर केला जात असल्याने शिंदे सरकार जाणार की राहणार? राष्ट्रपती राजवट लागू होईल का? याबाबत कालपासून तर्क वितर्कांना उधाण आले होते. आजच्या निर्णयाने आता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची लढाई आता घटनापीठासमोर होणार आहे.