कोरेगावमूळ ते अष्टापूर, बिवरी पुलासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव देणार; कोरेगावमूळचे सरपंच मंगेश कानकाटे यांची ग्वाही..
उरुळीकांचन : कोरेगावमूळ ते अष्टापूर, बिवरी या मुळा-मुठा नदीवरील पुलासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दिला जाणार असल्याचे प्रतिपादन कोरेगावमूळचे नवनिर्वाचित सरपंच मंगेश कानकाटे यांनी केले आहे.
कोरेगावमूळचे नवनिर्वाचित सरपंच मंगेश कानकाटे यांनी पदाचा पदाचा पदभार स्विकारताच अँक्शन मोडवर येऊन तात्काळ पूर्व हवेलीत मुळा -मुठा नदीकाठावरील गावांना जोडण्यासाठी अतिशय महत्वाचा कोरेगावमूळ ते अष्टापूर, बिवरी या पुलाच्या कामासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामाध्यमातून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नुकत्याच कोरेगावमूळ येथील एका कार्यक्रमात आमदार अशोक पवार यांनी कोरेगावमूळ पुलासाठी प्रयत्न करा अशी मागणी रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती.
त्यानुसार सरपंच मंगेश कानकाटे यांनी पदाचा पदभार स्विकारताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत पुलासाठी प्रस्ताव देणार असल्याचे म्हटले आहे. सरपंचपद स्विकारताच मंगेश कानकाटे यांनी ५६ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी उपसरपंच वैशाली सावंत,सदस्या अश्विनी कड, सदस्या सौ.लीलावती बोधे ,सदस्या राधिका काकडे, सदस्या सौ. पल्लवी नाझीरकर , सदस्या मंगल पवार सदस्य भानुदास जेधे , बापूसो बोधे, सदस्य सचिन निकाळजे ग्रामस्थ अमित सावंत, दिलीप शितोळे, अशोक सावंत, आप्पासाहेब कड, मुकिंदा काकडे नानासाहेब शिंदे, विठ्ठल थोरात, सुरेश भोसले, राजेंद्र शिंदे तसेच ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
भूमिपूजन झालेली विकास कामे पुढीलप्रमाणे :-
१.वॉर्ड क्र.१ विठ्ठल नगर येथे रस्ता काँक्रीट करणे रक्कम (१० लक्ष)
२.वॉर्ड क्र.१पुणे सोलापूर हायवे ते विठ्ठल नगर काँक्रिट करणे.( रक्कम ५ लक्ष)
३.वॉर्ड क्र.१ विठ्ठलनगर अंतर्गत रस्ता काँक्रीट करणे.५ लक्ष (जि प निधी)
४.वॉर्ड क्र.१सचिन कानकाटे घर ते दीपक शितोळे घर रस्ता काँक्रिट करणे(रक्कम ९ लक्ष)
५.वॉर्ड क्र.१ पुणे सोलापूर हायवे ते देशमुख वाडा हॉटेल रस्ता काँक्रिट करणे (रक्कम १० लक्ष )
६.वॉर्ड क्र.३ गावठाण येथे बंदिस्त भूमिगत गटर करणे. (रक्कम ७ लक्ष) (जि. प. निधी)