अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी ; मृतांचा आकडा 39 वर, अनेक जण जखमी..

पुणे : अभिनेता आणि तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख थलापती विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरीची घटना घडली असून यात तब्बल 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर करूरमध्ये विजय थलपती यांनी राजकीय रॅली आयोजित केली होती. या रॅलीत तब्बल 39 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रॅलीतील ढकलाढकली आणि चेंगराचींगरीत बेशुद्ध पडलेल्या महिला आणि मुलांसह असंख्य लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे घडली याची माहिती देखील आता समोर आली आहे. विजय यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी 50 हजार हून अधिक लोक जमले होते हजारोंच्या संख्येने लोक एकत्र आले. गर्दी नियंत्रण होती पण नववर्षाची मुलगी गर्दीत हरवल्याची माहिती समोर आली आणि चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे सांगितलं आहे.

कोण आहे थलापती विजय ?

थलापती विजय हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. तो एक अभिनेता असण्यासोबतच तो एक राजकारणी देखील आहे. विजयने 1992 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक हिट चित्रपट दिले असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कालांतराने त्याने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता आपल्या पक्षाच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 39 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
विजयने पक्षाची स्थापना कधी केली?
थलापती विजय यांनी आपल्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) या पक्षाची स्थापना 2 फेब्रुवारी 2024 रोजी केली होती. याच पक्षातून त्याने राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. या पक्षाचे मुख्यालय चेन्नईमध्ये आहे. विजयने तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक, मुख्यमंत्री स्टॅलिन आणि भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली असून आजच्या रॅलीत अपघात झाला आहे.
