Sreesanth : क्रिकेटविश्वात खळबळ! टीम इंडियाचा माजी खेळाडू फसवणुकीच्या आरोपाखाली अडकला, FIR दाखल…


Sreesanth : टीम इंडियाच्या एका माजी, बड्या खेळाडूला मोठा धक्का बसला असून तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. भारतीय संघातील या वेगवान गोलंदाजावर फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तो खेळाडू म्हणजे, माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत. आपल्या खेळाच्या कारकिर्दीपेक्षा, श्रीसंत हा अनेक वादांमुळेच जास्त चर्चेत राहिला आहे. आता तो पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. केरळ पोलिसांनी एस. श्रीसंत आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sreesanth

केरळच्या कन्नूर जिल्ह्यामधील एका व्यक्तीने एस.श्रीसंत आणि इतर दोघा व्यक्तींविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. त्याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एस. श्रीसंत आणि इतर दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात श्रीसंत याला तिसरा आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार व्यक्ती, सरीश गोपालन हे कन्नूर जिल्ह्यातील चूंडा येथे राहतात, त्यांनीच श्रीसंत आणि इतर दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. २५ एप्रिल २०१९ पासून ते आत्तापर्यंत आरोपी राजीव कुमार आणि वेंकटेश किनी या दोघांनी माझ्याकडून एकूण १८.७० लाख रुपये उकळले.

कर्नाटकच्या कोल्लूरमधअये खेळाशी संबंधित एक ॲकॅडमी उघडू आसा दावा आरोपी राजीव आणि वेंकटेश यांनी केला होता. त्यामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत हीही भागीदार आहे, असे त्यांनी सांगितले होते. या ॲकॅडमीमध्ये पार्टनर बनवण्याचं आश्वासन सरीश यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये पैशांची गुंकवणूक केली.

दरम्यान, त्यानंतर ॲकॅडमीच्या नावाखाली केवळ पैसे उकळण्यात आले. यात श्रीसंतचाही सहभाग असल्याचा आरोप सरीश गोपालन यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी श्रीसंतला आरोपी घोषित केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!