साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! शशिकांत शिंदे यांच्या घरात फूट, जेष्ठ बंधू शिवसेनेत..

सातारा : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. असे असताना आता जावळी तालुक्याचे नेते आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षांतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेत प्रवेश कल्याचे ऋषिकांत शिंदे यांनी प्रवेशानंतर खुलासा केला. यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्याची शक्यता आहे.
ऋषिकांत शिंदे यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठ धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यामुळे आता लोकसभा निवडणुक जवळ आली असताना मोठ्या घडामोडी घडत आहेत.
दरम्यान, आता शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जावळी तालुक्याचे लक्ष लागले आहे. ऋषिकांत शिंदे हे आमदार शशिकांत शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.
सातारा लोकसभेची जबाबदारी ही शिंदे यांच्याकडे दिली आहे. मात्र त्यांचेच बंधू शिवसेनेत गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.