अहिल्यानगरमधून बेलापूर , कोपरगावसाठी धावणार विशेष ट्रेन ..


Ahmednagar Railway : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील अहिल्यानगर, बेलापूर आणि कोपरगावमार्गे एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी 14 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने चालवली जाणार आहे.

यामुळे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने उपराजधानी नागपूर येथील दीक्षाभूमीला हजेरी लावणाऱ्या अनुयायांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

सोलापूर-नागपूर विशेष गाडी ( गाडी क्रमांक 01029) ही धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने चालवली जाणारी विशेष काळजी अहिल्यानगर, बेलापूर कोपरगाव मार्गे धावणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील या तिन्ही स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे. यामुळे या परिसरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

रेल्वे प्रशासन आणि सांगितल्याप्रमाणे ही विशेष गाडी 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता सोलापूरहून निघून, दुसऱ्या दिवशी दुपारी 12.45 वाजता नागपुरात पोहोचणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!