गौतमीसाठी कायपण! गौतमी पाटीलला चाहत्यांकडून खास गिफ्ट


पुणे : डान्सर गौतमी पाटीलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. याठिकाणी सक्रिय राहून ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या पोस्ट व व्हिडिओ टाकत असते. सध्या गौतमी पाटीलची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यामध्ये तिने आपल्या चाहत्यांनी दिलेल्या गिफ्ट्सचे फोटो पोस्ट केले आहेत. गौतमीच्या चाहत्यांनी गौतमीला विविध भेटी दिल्या आहेत. बऱ्याच चाहत्यांनी गौतमीला तिच्या फोटोंचे स्केच काढून गिफ्ट केले आहे.

काही लोकांनी खास फ्रेम्स दिल्या आहेत, ज्यामध्ये गौतमीचे सुंदर फोटो आहेत. या पोस्टखाली तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे. या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या असून आम्ही सुद्धा तुझ्यावर कविता किंवा निबंध लिहू शकतो, असे त्यामध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील खूपच चर्चेत आली आहे. अनेकदा ती वादात देखील सापडली आहे. यामुळे ती सतत चर्चेत असते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!