महायुतीत ठिणगी ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, महापालिकेत ताकद आजमावणार?


पुणे:आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असताना महायुतीत राष्ट्रवादीला भाजप आणि शिंदे सेनेसोबत जुळवून घेण्यात अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत.पुण्यात भाजपने अगोदरच स्वतंत्र बाणा जाहीर केला आहे. त्यामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यातील अनेक महापालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या रात्री जवळपास १ तास बैठक झाली.या बैठकीतील तपशील अजून समोर आला नाही.पण ज्या ज्या ठिकाणी युतीत लढणे शक्य आहे, अशा ठिकाणच्या जागांची चाचपणी करण्यासंबंधी चर्चा झाली तर राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र लढण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

दरम्यान पुणे,पिंपरी-चिंचवड आणि अमरावती, मुंबई मनपा या महापालिकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.स्वतंत्र लढण्याच्या संदर्भात पुढील काही दिवसात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

       

दरम्यान आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत कुठे कुठे युती होणार याची घोषणा नगर परिषद निकालानंतर करण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे याविषयीचा निर्णय 23 अथवा 24 डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!