वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विश्व रेकॉर्ड…!


प्रिटोरिया : दक्षिण आफ्रिकेने वेस्टइंडिज सोबत चालू असलेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात अप्रतिम विजय नोंदवून, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका ३० पेक्षा कमी षटकांत २५० अधिक धावांचे लक्ष्य गाठणारा एकमेव संघ ठरला.

 

 

यापूर्वी कोणत्याही संघाला हे करता आले नव्हते आणि आता हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर नोंदवला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेने आज ८.९५ च्या धावगतीने २०० किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला, ही त्यांची एकदिवसीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

 

 

वेस्टइंडिजचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर आहे. दक्षिण आफ्रिकेने, वेस्टइंडिज चे दोन कसोटी सामन्यांमध्ये, दोन्ही कसोटी सामने आपल्या नावावर केले.

 

त्यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे खराब झाला आणि नाणेफेक करणे हि शक्य झाली नाही. वेस्ट इंडिजने दुसरा एकदिवसीय सामना ४८ धावांनी ंिजकला, मात्र तिस-या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत, वेस्ट इंडिजचा ४ गडी राखून पराभव करून मालिकेत बरोबरी साधली.

 

दक्षिण आफ्रिकेने २००६ मध्ये जोहान्सबर्ग येथील वांडरर्स येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक विक्रमी ४३५ धावा (४९ .५ षटकात 438/९) धावांचा पाठलाग करताना, ८.७८ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!