‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ पाठीत खंजीर खुपसणे व सहकारी संस्था लुटून अर्थिक उन्नती करणे हा आपला राजकीय गुणधर्म -माधवअण्णा काळभोर यांचे प्रकाश जगतापांना प्रतिउत्तर
उरुळीकांचन : हवेली तालुका खरेदी विक्री संघावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची १ कोटी २० लाख रुपये कर्ज देणी थकबाकी असल्याने खरेदी विक्री संघाच्या मालकीचे प्लॉट हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सहभागीदारी म्हणून विकसित झाली आहे. ते कोणा मर्जीतील बिल्डरला लागेबांधे म्हणून विक्री झाले नाही. सिटीझन बँक बुडवली म्हणाऱ्यांनी ही बँक अडचणीत आली तेंव्हा बँकेचे सहपालकत्व सांभाळणारे अध्यक्ष गोपाळ म्हस्के हे तुमच्या पॅनेलचे प्रचारक आहेत, या प्लॉट लिलावाची कार्यवाही झाली तेंव्हा खरेदी संघावर संचालक कोण होते, त्यावेळी आपण कोणाची कारकूनी करत होता.
त्यावेळी आपले नेते कोण होते, आपण बाजार समितीचे सभापती झाल्यानंतर आपला अर्थिक उत्कर्ष कसा झाला हे पाहणारा संपूर्ण हवेली तालुका व पुणे जिल्हा असल्याने विरोधकांचे आरोप म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ म्हणण्याची वेळ आली असून प्रत्येक वेळी नवा नेता शोधून राजकीय दुकान चालविणाऱ्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारु नये अशी शेलकी टिकेने प्रकाश जगताप यांचे नाव घेऊन त्यांच्या आरोपांना माधवअण्णा काळभोर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
यशवंत कारखान्याच्या निवडणुकीत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख तसेच हवेली बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप यांनी माधव काळभोर व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या आरोपांना व आरोपांनीच प्रतिउत्तर दिले आहे.
माधवराव काळभोर म्हणाले, की आपली संपूर्ण कार्यकीर्य भ्रष्ट कारभारावर आधारीत आहे. भ्रष्टाचाराची नैतिकता सांगणारे प्रकाश जगताप यांचा खरा मुखवटा तालुका जाणून आहे. त्यांनी वेळोवेळी कुणाचे बोट धरुन कुणाच्या पाठीत कसा खंजीर खुपसला हे कारस्थान तालुका माहित आहे. प्रत्येक वेळी नवा नेता निवडणे व त्यांचा वापर करुन घात करणे, पुन्हा नवा घरोबा करणे ही कृतघ्नता जगताप व त्यांचे नवीन सहकारी करीत आले आहेत. एकदा स्वार्थासाठी गुरू माणने व स्वार्थ संपला की, गुरुदक्षिणेची फेड खंजीर खुपसून करणे हे त्यांची खासियत आहे. ते कोणाच्या बोटाला धरुन मोठे झाले,काय धंदे केले हे माहिती नसण्याईतकी जनता दुधखुळी नक्कीच नाही.आपला पू्र्व इतिहास काय आहे ? आपण किती जणांना रस्त्यावर आणले लावले आहे , आपला प्रामाणिक किती आहे. हे प्रत्येक वेळी जिल्हा बॅक , बाजार समितीला दिसून आला आहे.
आपण सभापती झाल्यानंतर आपला इतका अर्थिक उत्कर्ष कसा झाला, ही सुज्ञ जनता ओळखून आहे. आपले कर्तृत्व असे की आपण बाजार समितीला बरखास्त करण्याची परिस्थिती आणून ठेवली. आपल्या कार्यकिर्दीत मांजरी बाजार समितीसाठी जमिन खरेदीसाठी काय हातचा राखला , बाजार समिती फर्निचर घोटाळा, डांबरीकरणात खोटे बिल वसुली करणे , बाजार समिती जागा खरेदी कमी दराने शक्य असताना ,जादा दराने खरेदी करायला लावणे असा निष्कर्ष मुलानी समितीने बाजार समितीच्या चौकशीत आपल्यावर ठेवला आहे.
माधव काळभोर पुढे म्हणाले, आपला उद्देश फक्त सहकारी संस्था ओरबडे आहे.आपण स्वतः हा आरश्यापुढे उभे राहून आपण काय आहेत पहावे ,मग लोकांना आपले तत्वज्ञान शिकवावे अशा शब्दांत त्यांनी प्रकाश जगताप यांच्यावर निशाण साधला आहे. आपणे संबंध आयुष्यात काय कारनामे कोणासोबत केले आहेत, हे अधिक सांगण्याची वेळ आणू नये असा थेट इशारा माधवराव काळभोर यांनी दिला आहे.