सोरतापवाडीत ‘हर हर महादेव’ चा जयघोष ! सोरतापेश्वर चरणी भाविकांची मांदीआळी…!


उरुळीकांचन : प्रति भिमाशंकर शिवलिंगाची प्रतिकृती असलेल्या सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील पवित्र शिवलिंगाचे महाशिवरात्री निमित्ताने १० हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती सोरतापवाडी देवस्थान समितीचे अध्यक्ष माऊली लाड यांनी दिली आहे.

प्रतिभिमाशंकर शिवलिंगाची प्रतिकृती व उंच टेकडीवर असलेल्या सोरतापवाडी येथील सोरतापेश्वराची जागृत देवस्थान असलेल्या पवित्र स्थळी महाशिवारात्री निमित्त मोठ्या उत्साह साजरा करण्याची परंपरा या ठिकाणी आहे. देवस्थान समितीच्या वतीने नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षीही अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन परिसरातील सर्व नागरीकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली आहे. महाशिवरात्री निमित्ताने देवस्थानच्या भरगच्च कार्यक्रमांना भाविकांनी सहभाग घेतला. पहाटे ४ वाजता भाविकांच्या उपस्थितीत ग्रामोपाध्याय बाबा महाराज तिखे यांच्या हस्ते रुद्राअभिषेक पहाटेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सकाळपासून भाविकांनी दर्शनास गर्दी केली होती. दुपारी भाविक व ग्रामस्थांसाठी चेतनशास्त्री माथेफोड महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी ७ वा सोरतापेश्वराची महाआरती सरपंच संध्या चौधरी, माथाडी नेते बाळासाहेब चौधरी, योगेश थेऊरकर,मुकेश थेऊरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीच्या वतीने फराळाचे आयोजन करण्यात आले होते .तसेच स्वच्छ पिण्याच्या व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान अखंड हरिणाम सप्ताहात कावड मिरवणूक, शिवलिला ग्रंथ पारायण, हरिणाम जप ,हरिपाट अशा धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. देवस्थान समितीच्या वतीने आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात अध्यक्ष माऊली लाड,उपाध्यक्ष सुनिल महाराज चोरघे, सहसचिव पांडुरंग म्हस्के , खजिनदार भाऊसाहेब चौधरी , विश्वस्त अशोक दत्तात्रय चौधरी , अनिल लाड, पुजारी विठ्ठल कोळेकर, तसेच रमेश पिसाळ, सुनील हाके, दत्ता कोळेकर यादींनी परिश्रम घेतले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!