Sortapwadi : सोरतापवाडी स्वच्छता ग्रुपने निभावले किल्ले सिंहगड स्वच्छतेचे कर्तव्य! हवेली पंचायत समितीचा किल्ले स्वच्छतेचा अनोखा उपक्रम..!!

Sortapwadi उरुळीकांचन : किल्ले सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समितीने आयोजित केलेल्या गड- किल्ले स्वच्छता अभियान मोहिमेत हवेली पंचायत समितीने केलेल्या अवाहना नुसार सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील स्वच्छता अभियान ग्रुपच्या सदस्यांनी सहभागी होत स्वच्छतेची आपली जबाबदारी पार पाडली.
तसेच नवभारताच्या स्वच्छतेच्या संकल्पनेची शासनाच्या मदतीने साक्ष दिली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने पुणे जिल्ह्यातीलसर्व गड -किल्ल्यांचा स्वच्छतेची मोहिम शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाआयोजित केली होती.
त्यानुसार हवेली पंचायत समितीच्या वतीनेशिवरायांच्या पराक्रमाचा साक्ष असणाऱ्या किल्ले सिंहगडावर रविवार (दि.१८) रोजी स्वच्छता मोहिम आयोजित केली होती. या स्वच्छता मोहिमेसाठी हवेली पंचायत समितीने तालुक्यातील ग्रामस्तरावर स्वच्छता मोहीमेत काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. Sortapwadi
त्यानुसार सोरतापवाडीतील स्वच्छता अभियान ग्रुपने स्वच्छता अभियानात सहभागी होत स्वच्छतेचे आपले कर्तव्य केले आहे. त्यानुसार सोरतापवाडी स्वच्छता अभियान ग्रुप ,शिवप्रेमी संघटना आदींनी किल्ले सिंहगड परिसरातून सुमारे १७ पोती कचरा गोळा संकलित केला आहे. या कार्यात सोरतापवाडीतून २५ हून अधिक स्वच्छता दूत सहभागी झाले होते. त्यांच्यासह प्रशासनाने ८० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
या स्वच्छता अभियानासाठी हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उप अभियंता अप्पासाहेब गुजर , विकास कुडले, वनरक्षक बळिराम वायकर, घेरा सिंहगडच्या सरपंच मोनिका पढेर, उपसरपंच गणेश गोफणे, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर यांच्यासह सोरतापवाडी स्वच्छता ग्रुपच्या शितल चौधरी, धनंजय चौधरी, हरीमामा अडागळे, अलका हुड मनीषा म्हस्के, राजश्री गाढवे ,प्रणाली जागडे, मयुर चौधरी सुकन्या थोरात आदींनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत सोरतापवाडीत अखंडपणे ३०० हून अधिक आठवडे निरंतर दर रविवारी स्वच्छता अभियान या ग्रुपच्या वतीने राबविले जात आहे.