‘माझ्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल सॉरी’ ; माजी नगरसेवकाच्या मुलाने आयुष्याचा केला शेवट…..


छत्रपती संभाजीनगर : माजी नगरसेवकाच्या मुलाने राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं असल्याने खळबळ उडाली आहे.‘माझ्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल सॉरी’ अशी नोट लिहून २७ वर्षीय युवकाने उस्मानपुरा भागातील एकदंत अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव दीपेश राजू तनवाणी (वय 27 रा. गुलमंडी, ह. मु. एकदंत सोसायटी, चौथा मजला) असे आहे. दीपेश माजी नगरसेवक राजू तनवाणी यांचा मुलगा होता. तो काही दिवसांपासून तणावात होता.. एकदंत अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये दीपेश थांबला होता. आईला शेवटचा कॉल करून दीपेशने आपल्या आयुष्याचा शेवट केला.रात्री आठ वाजता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झाला नाही. त्यामुळे नातेवाइक एकदंत अपार्टमेंट येथे गेले. त्या वेळी दीपेशने जीव दिल्याचं समोर आले. या प्रकाराची माहिती तनवाणी कुटुंबीयांसह पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्यासह उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान दीपेशने गळफास घेतलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांना एक नोट आढळली. इंग्रजीत लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये ‘मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. परिवारांतील सर्व जण काळजी घ्या,’ असे लिहिले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!