प्रियंका गांधी यांच्या कुटूंबाचे रांगेत उभे राहून मतदान ! सोनिया गांधींनी केले झाडूला मतदान ..!!


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सात जागांवर मतदान होत आहे. यावेळी १३६३७ मतदान केंद्रांवर १.५२ कोटी लोक १६२ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांचा मुलगा रेहान वड्रा आणि मुलगी मिराया वड्रा यांनी दिल्लीतील मतदान केंद्रावर रांगेत उभे राहुन मतदान केले. त्याचवेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही मतदान केले.

 

रेहान वाड्रा आणि मुलगी मिराया वड्रा यांनी लोधी इस्टेटमधील अटल आयडियल स्कूलमध्ये जाऊन मतदान केले. विशेष म्हणजे मिराया यावेळी पहिल्यांदाच मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर तिने माध्यमांशी संवाध साधला, यावेळी मिराया वड्रा म्हणाल्या की, तरुणांना माझा संदेश आहे की तुम्ही घराबाहेर पडा आणि मतदान करा.

 

बदल घडवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे.दुसरीकडे सोनिया गांधी आणि राहुल गांधी मतदान करण्यासाठी दिल्लीतील एका मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान केल्यानंतर मतदान केंद्रातून बाहेर पडताना त्यांनी सेल्फी काढला.

 

 

याशिवाय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी दिल्लीतील एका मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी माध्यमांनी त्यांना राहुल गांधींनी आपला आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला मत दिलं, असं प्रियांकाला विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, आम्ही आमच्या तक्रारी बाजूला ठेऊन आपल्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी मतदान केले. याचा मला अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!