कोल्हापूर हादरलं! दारूला पैसे देत नाही म्हणून मुलाकडून आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या, घटनेने खळबळ..

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका मुलाने केवळ दारूसाठी पैसे दिले नाहीत या क्षुल्लक कारणावरून आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे.

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे साळुंखे पार्क परिसरात आणि संपूर्ण शहरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. सावित्रीबाई अरुण निकम असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून तिचं वय ५३ वर्ष होतं. तर विजय निकम असं मुलाचं नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी खून करणारा नराधम मुलगा विजय निकमला घटनास्थळावरून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील साळुंखे पार्कमध्ये घटना घडली. सावित्रीबाई यांच्या मुलाला दारूचे व्यसन असल्याने तो कायम पैशासाठी तगादा लावायचा. आज पहाटे त्याने तिच्याकडे दारूसाठी पैसे मागणी केल्यानंतर मायलेकामध्ये वाद झाला. सावित्रीबाईंनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं.

वाद सुरू असताना रागाने संतप्त झालेल्या सावित्रीबाई यांच्या मुलाने त्यांच्या डोक्यात वरवंटा घातला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे सावित्रीबाई यांचा जागीच मृत्यू झाला. आईच्या हत्येनंतर आरोपीने पळ काढला नाही तर तो तिथे मृतदेहाचा बाजूला बसून होता.
दरम्यान, धक्कादायक म्हणजे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतरही आईची हत्या केली म्हणून तरुणाच्या चेहऱ्यावर पश्चातापचे भाव दिसत नव्हते. झालेल्या घटनेची माहिती स्थानिकांनीपोलिसांना दिली. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला गजाआड केलं.