जावई अटकेत ; एकनाथ खडसें यांच्याकडून गंभीर आरोप, पुणे पोलीस आयुक्ताचं सणसणीत प्रत्युत्तर , म्हणाले…

पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टीवर 27 जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकला होता.या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खेवलकर यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या आरोपानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी उत्तर दिलं.

या कारवाईदरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, जी कारवाई झाली, त्याची विस्तृत माहिती दिली आहे. पारदर्शरक आणि कायदेशीर कारवाई होईल. कोणीही पोलिस दलावर शंका ठेवायची गरज नाही. कोणत्याही प्रकाराचा फोटो आणि व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेला नाही, असे त्यानीं स्पष्ट सांगितलं.पोलिस ठाण्याच्या आतमध्ये देखील रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही. आम्ही काही लीक करत नाही, जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतील, त्याला थांबवू शकत नाही. कोणताही व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेला नाही, असे स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त यांनी दिल आहे.
दरम्यान या प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी देखील ट्विट करून कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं,योग्यवेळी सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केले आहे. दरम्यान दुसरीकडे पुणे पोलिसांनी याप्रकरणी कारवाई देखील सुरू केली आहे.
