गर्लफ्रेंडला अर्वाच्च भाषेत बोलल्याने वडिलांचा गळा दाबून खून! खुनानंतर मृतदेह फॅनला अडकवून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न…!


पिंपरी : सध्या सहशक्ती व संवेदनशीलतेचा अंत होत असल्याचे चित्र अनेक गुन्ह्यामधून समोर येत आहे.मुलाच्या गर्लफ्रेंडला अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने व पत्नीने गळा आवळून चक्क गळा आवळून खून केला आहे. हि घटना दिघी येथे रविवारी (दि.5) रात्री उशीरा घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी राहूल अशोक जाधव (वय 25), अनिल अशोक जाधव (वय 23) यांना दिघी पोलिसांनी अटक केली असून पत्नीवर ही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर अशोक रामदास जाधव (वय 45) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीबद्दल मयत अशोक यांनी अपशब्द वापरले होते. याचाच राग येवून दोन मुलांनी घरातील दोरीने गळा आवळून अशोक यांचा खून केला. यावेळी फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसत आईने पुरावा नष्ट कऱण्याचा प्रयत्न केला.तर अशोक याने मृतदेह घरातील फॅनला अडकवून आत्महत्या केल्याचा दिखावा केला. यावरून पोलिसांनी तिघांविरोधातही गुन्हा दाखल केला असून दिघी पोलीस याचा तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!