Somvati Amavasya Yatra 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार: जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा, देशभरातून भाविकांची अलोट गर्दी..

Somvati Amavasya Yatra 2023 : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची जेजुरी भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे. आज जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा असून, यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत दाखल झाले आहेत.
तर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. कऱ्हा नदीवर देवाचा पालखी सोहळा स्नानासाठी आल्यानंतर भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आलं आहे. राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. Somvati Amavasya Yatra 2023
जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा आज १३ नोव्हेंबरला भरली आहे. सकाळी ७ च्या सुमारास खंडोबा गडावरुन हा पालखी सोहळा सुरू झाला आहे. दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीचं कर्हा नदीवर स्नान सोहळा संपन्न होणार आहे.
या यात्रेसाठी राज्यभरातून जेजुरी गडावर अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोमवती यात्रेच्या नियोजनाबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट ड्रेसकोड देण्यात आला आहे. तसेच, पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा,पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.