समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील शिपाई शिपदावरील सोमनाथ रावडे ‘सेट’ परीक्षेत उत्तीर्ण…


लोणीकाळभोर : येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेले सोमनाथ यशवंत रावडे ३० ऑगस्ट २०२५ रोजी “लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयातून विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेण्यात आलेल्या ‘सेट’ परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

सदर परीक्षा ही १५ जून २०२५ रोजी घेण्यात आली होती. नोकरीला लागले तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त इयत्ता१२ वी उत्तीर्ण होते. नोकरी व प्रपंचाचा गाडा सांभाळत एका पायाने अपंग असूनही त्यांनी आपल्या व्यंगावर मात करीत मोठया जिद्दीने व कष्टाने बी. (B. Lib)लिब, एम. लिब.(M. Lib ) इत्यादी पदवी व पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या.

सेट ही पात्रता चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत तीन वेळा प्रयत्न केले होते. प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नव्हते. म्हणून त्यांनी आपली जिद्द व परिश्रम सोडले नाही.चौथ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. त्यामुळे ४ सप्टेंबर २०२५ रोजी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य सतीश कुदळे, डॉ. स्नेहा बुरगुल उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनीकडून तसेच लोणीकाळभोर परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!